Bailgada Shayrat Trending Banner PLP | Bailgada Shayrat Banner Editing 2023 | Pixellab PLP Fail In Bailgada Shayrat

 जय शिवराय मित्रांनो..

मी धिरज साळोखे स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये ह्या ब्लॉग मध्ये बैलगाडा शर्यत क्षेत्रा मधील जे सोशल मीडीया वरती TRENDING बॅनर येत आहे ते कशा प्रकारे तयार करायचे हे मी पुढे सांगीतलं आहे. 


• बॅनर तयार करण्यासाठी लागणारी साहीत्य सामग्री :

1) Pixellab App 

2) Picsart App

3) Background Eraser App

4) Material (बैलांच्या Photo ची PNG, Pixellab PLP File, Calligraphy)

STEP 01 :

सर्वात आधी तुमच्या बैलाच्या फोटो मागचा बॅकग्राऊंड तुम्हाला इरेज करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला बॅकग्राऊंड इरेजर एप्लीकेशन लागेल बॅकग्राऊंड इरेजर एप्लीकेशन प्ले-स्टोअर अप्प वरती अवेलेबल आहे तिथून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन ओपन करायच आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बैलाचा फोटो तिथे ऍड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मेन्यूअल साईज असे एक ऑप्शन बघायला भेटेल ते तुम्हाला ऍडजेस्ट करून फोटो मागचा बॅकग्राऊंड इरेज करायचा आहे.


STEP 02 :

फोटो मागचा बॅकग्राऊंड इरेज केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि पिक्सआर्ट एप्लीकेशन ओपन करून घ्यायचा आहे पिक्सआर्ट एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड ऍड करायचं आहे. ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड ऍड केल्यानंतर तुम्हाला तुम्ही इरेज केलेल्या फोटो ऍड करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक वरती इरेझरचा आयकॉन बघायला भेटेल सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि खालती दिलेले सेटिंग सेट करून तुम्हाला इथे खालचा भाग एकदम स्मूथ इरेज करायचा आहे.



STEP 03 :

पिक्सलॅब एप्लीकेशन मध्ये पी एल पी फाईल ओपन करून घ्यायची आहे त्यानंतर लेअर पॅनल वरती क्लिक करून बैलाची पीएनजी तुम्हाला येथे हाईट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमची पीएनजी ऍड करण्यासाठी प्लस आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईल मधले फोल्डर्स ओपन होऊन जातील तुम्हाला तुमची पीएनजी ऍड करून घ्यायची आहे पीएनजी ऍड केल्यानंतर साईज तुम्हाला इथे ऍडजेस्ट करायची आहे आणि बैलाची पीएनजी व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे.




Read More: AdSense Address Verification 



STEP 04 :

तुम्हाला एक बैलाच्या नावाची कॅलिग्राफी बघायला भेटेल ती कॅलिग्राफी तुम्हाला डिलीट करून टाकायची आहे आणि तुम्हाला तुमची कॅलिग्राफी ॲड करून घ्यायची आहे. मित्रांनो अशा प्रकारच्या कॅलिग्राफी वरती ऑलरेडी मी तीन पार्ट बनवले आहेत. त्याची लिंक ही तुम्हाला खालती मी दिली आहे जर तुम्ही ते बघितले नसतील ते तुम्ही एकदा बघून घ्या त्यामध्ये तुम्हाला तुमच्या बैलाच्या नावाची कॅलिग्राफी मिळते की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे.

CALLIGRAPHY PART 01

CALLIGRAPHY PART 02

CALLIGRAPHY PART 03


STEP 05 :

कॅलिग्राफीच्या वरती तुम्हाला एक रुस्तम-ए-हिंदकेसरी अशा प्रकारचे नाव बघायला भेटेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही चेंजेस करू शकता तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि एडिट ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला तुमचे चेंजेस करून घ्यायचे आहेत. एवढे चेंजेस केल्यानंतर तुमची डिझाईन तयार होऊन जाईल. डिझाईन सेव करण्यासाठी सेव आयकॉन वर क्लिक करायचं आहे आणि कॉलिटी अल्ट्रा सिलेक्ट करून सेव टू गॅलरी वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमची बॅनर डिझाईन गॅलरी मध्ये सेव्ह होऊन जाईल.

Material Download

मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढेच होतं मी आशा करतो की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग सोबत तो पर्यंत काळजी घ्या. जय हिंद.! जय महाराष्ट्र.!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या