जय शिवराय मित्रांनो.!
मी धिरज साळोखे स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये वेडिंग इंविटेशन व्हिडिओ कशी तयार करायची हे मी सविस्तर सांगितलं आहे. व्हिडिओ तयार करण्यासाठी जे मटेरियल लागणार आहे त्याची लिंक खालती दिली आहे. खालती स्क्रॉल करून आपले मटेरियल तुम्ही डाऊनलोड करू शकता.
WEDDING INVITATION VIDEO EDITING
लग्नपत्रिका निमंत्रण व्हिडिओची रचना करण्यासाठी तुम्ही खालीलप्रमाणे पातळींवर लक्ष देऊ शकता :
वधू-वरांचे नाव : व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी वधू-वरांचे पूर्ण नाव आणि त्यांच्या पदव्यांसह दर्शवा. आपल्या व्हिडिओमध्ये त्यांचे एक छायाचित्र दाखवू शकता.
लग्नाची तारीख व वेळ : व्हिडिओमध्ये लग्नाची दिनांक आणि वेळ स्पष्टपणे दर्शवा. त्यासाठी तुमच्या व्हिडिओमध्ये गोड फॉन्ट वापरा आणि आकर्षक ग्राफिक्स जोडणी करा.
स्थळ : लग्नाच्या आयोजनाच्या जगातल्या स्थळाचे एक छायाचित्र दाखवा. त्याच्या आवश्यक माहिती, जसे कि संकेतस्थळ किंवा पत्ता आपल्या व्हिडिओमध्ये दाखवा.
हळदी समारंभ : हळदी समारंभाची दिनांक, वेळ आणि स्थळ स्पष्टपणे दर्शवा. गोड फॉन्ट वापरा आणि आकर्षक ग्राफिक्स जोडणी करा.
Video Link
• साहित्य / सामग्री :
- Kinemaster App
- Pixellab App
- India Font Converter App
- Wedding Text PLP File
- Kinemaster Project File
- Animation Effect
- Song
STEP 01 :
सर्वात आधी तुम्हाला आपलं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. मटेरियल मध्ये Wedding Text तयार करण्यासाठी Pixellab PLP File दिली आहे. त्याच सोबत Kinemaster Project File, Animation Video Effect, Song दिले आहे. हे सर्व मटेरियल डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला Pixellab मध्ये PLP फाईल Open करायची आहे. PLP फाईल Open केल्यानंतर लेयर पॅनलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर टॅक्सच्या लेयर चा लॉक काढून टाकायचा आहे. लॉक काढल्यानंतर तुम्हाला तुमची वेडिंग टॅक्स तयार करून घ्यायची आहे. वेडिंग टेक्स तयार केल्यानंतर ती तुम्हाला PNG फॉरमॅटमध्ये सेव्ह करून घ्यायची आहे.
STEP 02 :
सर्व वेडिंग टेक्स तयार केल्यानंतर Kinemaster मध्ये प्रोजेक्ट फाईल Import करून घ्यायची आहे. प्रोजेक्ट फाईल Import केल्यानंतर जेवढ्या लेअर्स आहेत तेवढ्या सर्व लेयर्स रिप्लेस करून घ्यायच्या आहेत. लेयर रिप्लेस करण्यासाठी एकदम सिम्पल मध्ये लेअर वर क्लिक करायचं आहे त्यानंतर राईट कॉर्नरला एक रिप्लेसच ऑप्शन बघायला भेटेल त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेम टॅक्स सिलेक्ट करून ती व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. याच प्रोसेस मध्ये सर्व लेयर रिप्लेस करून घ्यायचे आहेत. सर्व लेयर्स रिप्लेस केल्यानंतर वरती एक Export ऑप्शन बघायला भेटेल त्यावर ती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॉलिटी 720p ठेवायची आहे आणि Save As Video ऑप्शन वर क्लिक करायचं आहे त्यानंतर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल.
STEP 03 :
व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर Kinemaster App मध्ये 16:9 हा रेशो Select करून न्यू-प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ ॲड करायचा आहे. व्हिडिओ ऍड केल्यानंतर व्हिडिओमध्ये असलेला एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा पार्ट कट करण्यासाठी जिथे एक्स्ट्रा पार्ट आहे. तिथे थोडं स्क्रॉल करायचं आहे त्यानंतर व्हिडिओ वर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर राईट कॉर्नर मध्ये काही ऑप्शन बघायला भेटतील तिथे एक कैची च ऑप्शन बघायला भेटेल एकदम सिम्पल मध्ये त्यावरती क्लिक करून तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे.
STEP 04 :
सर्व एक्स्ट्रा पार्ट कट केल्यानंतर व्हिडिओच्या लेयरला कट्स बसलेले बघायला भेटतील तर या सर्व कट्सला इफेक्ट अप्लाय करायचं आहे. त्यासाठी स्टार्टिंगला यायचे स्टॅटिंगला आल्यानंतर जो फर्स्ट कट आहे. त्यावर ती क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर राईट कॉर्नरला काही ऑप्शन बघायला भेटतील तुम्हाला Rotate Split आणि Retrospection हे दोन इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे इफेक्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला वरती एक शॉप किंवा स्टोअर च आयकॉन बघायला भेटेल सिम्पल मध्ये त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर ती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा डाटा ऑन करून तुम्हाला हे दोन इफेक्ट इन्स्टॉल करून घ्यायचं आहेत. हे दोन्ही इफेक्ट इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्यामधल्या Retrospection effect वरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही इफेक्ट बघायला भेटतील त्यामधला तुम्हाला पाचवा इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर पुढे सुद्धा सेम इफेक्ट द्यायचा आहे. एवढं केल्यानंतर पुढे जेवढे कट्स आहेत त्यांना Rotate Split मधला तिसरा इफेक्ट द्यायचा आहे.
STEP 05 :
सर्व कट्स ला इफेक्ट दिल्यानंतर आत्ता ॲनिमेशन व्हिडिओ इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी लेयर वरती क्लिक करायचे त्यानंतर मीडियावर क्लिक करायचे मीडियावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या फोल्डर मध्ये मटेरियल ठेवला असेल ते फोल्डर ओपन करायचं आहे आणि त्यामधला ॲनिमेशन इफेक्ट तुम्हाला ऍड करायचं आहे. ॲनिमेशन इफेक्ट ऍड केल्यानंतर तुम्हाला राईट कॉर्नरला काही ऑप्शन बघायला भेटतील खालती तुम्हाला थोडस स्क्रॉल करायचे स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला Split Screen या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा थोडं खालती स्क्रॉल करायचं आहे आणि एक ब्लेंडिंगचं ऑप्शन बघायला भेटेल त्यावर ती क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर त्या मधला स्क्रीन हा इफेक्ट द्यायचा आहे. एवढे केल्यानंतर आता आपल्याला सॉंग ऍड करून घ्यायचं आहे त्यासाठी पुन्हा लेअरच्या आयकॉनवर क्लिक करायचे त्यानंतर मीडियावर क्लिक करायचे आणि तुम्ही ज्या फोल्डरमध्ये मटेरियल ठेवला असेल ते फोल्डर तुम्हाला पुन्हा ओपन करायचं आहे फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली सॉंग ऍड करून घ्यायचं आहे. सॉंग ऍड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला राईट कॉर्नरला काही ऑप्शन बघायला भेटतील तर तुम्हाला खालती स्क्रॉल करायचे स्क्रॉल केल्यानंतर एक्सट्रॅक्ट ऑडिओ अशा प्रकारचा एक ऑप्शन बघायला भेटेल सिम्पली त्यावर क्लिक करायचे त्यानंतर ऑडिओ एक्सट्रॅक्ट होऊन जाईल आणि जी व्हिडिओ आहे ती व्हिडिओ तुम्हाला डिलीट करून टाकायची आहे. तर मित्रांनो एवढी प्रोसेस केल्यानंतर तुमची वेडिंग इंविटेशन व्हिडिओ पूर्णपणे एडिट होऊन जाईल व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती एक्सपोर्टच्या आयकॉनवर क्लिक करायचे त्यानंतर कॉलिटी 720p ठेवून तुम्हाला Save As Video वरती क्लिक करायचे तुमची व्हिडिओ गॅलरीमध्ये Save होऊन जाईल त्यानंतर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्र परिवाराला इनविटेशन करू शकता.
मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच होतं मी आशा करतो की तुम्हाला आजचा ब्लॉग आपला आवडला असेल. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग सोबत तोपर्यंत काळजी घ्या.. जय हिंद.! जय महाराष्ट्र.!
0 टिप्पण्या