Children Birthday Banner Editing

Children Birthday Banner Editing


जय शिवराय मित्रांनो.! मी धिरज साळोखे स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये आपण लहान मुलांचे / मुलींचे वाढदिवस बॅनर कशा प्रकारे तयार करायचे हे मी पुढे आपल्या ब्लॉगमध्ये एकदम सोप्या भाषेत सांगितलं आहे. तरी मित्रांनो तुमच्या मुलाचं किंवा तुमच्या परिवारांमधील लहान मुलाचं वाढदिवस आहे आणि तुम्हाला एक सुंदर असं बॅनर करायचं आहे तर मित्रांनो काहीच विषय नाही तुमचा भाऊ.! आहे ना तुम्हाला सगळं काही सांगितलं आहे आणि बॅनर बनवण्यासाठी आपल्याला जे मटेरियल लागणार आहे त्याची लिंक ही तुम्हाला खालती दिली आहे. खालती स्क्रॉल करून तुम्ही आपलं मटेरियल डाउनलोड करू शकता.


CHILDREN BIRTHDAY BANNER EDITING 


• साहित्य / सामग्री


  1. आपलं मटेरियल (background, png, plp file)
  2. Picsart app 
  3. Pixellab app
  4. Background Eraser app
  5. Lightroom app


वरील साहित्य मधील मटेरियल म्हणजे तुम्हाला मी background, png, plp file याचं पॅकेज दिलं आहे. हे पॅकेज तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. ह्या मटेरियल ची लिंक ही खालती दिली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता. त्याच सोबत लागणारे सर्व ॲप्स सुद्धा प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर वरून डाऊनलोड करून घ्यायचं आहे.


• बॅनर तयार करत असताना पुढील

 गोष्टींकडे लक्ष द्यावे :


1) नाव : बॅनर मध्ये मुलाचं नाव चमकदार आणि आकर्षक असावं आणि सुंदर रंगांच्या पॅटर्न वापरून आकर्षक फॉन्ट मध्ये तयार करावे. 


2) वाढदिवसाची तारीख : वाढदिवसाची तारीख बॅनरवर उठवून दिसली पाहिजे त्यामुळे बॅनर अजून सुंदर होईल. वाढदिवसाच्या वर्षानुवर्ती नंबर (उदा. 1 व्या, 2 रा, 3 रा ) बॅनरवर घालून वाढदिवसाच्या नंबरची ओळख करून द्यावी.


3) बॅकग्राऊंड : बॅकग्राऊंड आकर्षक आणि प्रभावशाळी रंगाचा निवडा. लहान मुलांसाठी उल्हासदायक रंगांचा वापर करावा.


4) फोटो : बॅनरवर लहान मुलांचे आकर्षक फोटो  लावा. आणि फोटोला चांगले इफेक्ट द्या त्यामुळे बॅनर अजून सुंदर होईल.


5) संदेश : बॅनरवर मुलाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असलेले संदेश समाविष्ट करा. त्यामुळे ते त्यांच्या जन्मदिवशी अधिक विशेष म्हणून अनुभवावे.



Read More: AdSense Address Verification 


STEP 01 :

मित्रांनो सर्वात आधी जो मॉडेल असणार आहे त्याच्या फोटो ला गोल्डन इफेक्ट द्यायचा आहे जो तुम्ही बॅनर मध्ये बॅक साईडची दोन चे फोटो होते त्या फोटोंना तुम्ही गोल्डन इफेक्ट बघितला तो सेम इफेक्ट देण्यासाठी आपल्याला लाईटरूम एप्लीकेशन लागेल तुम्हाला ॲप डाऊनलोड करायचं आहे. आपल्या ला दोन फोटोला गोल्डन इफेक्ट द्यायचा आहे आणि जो तिसरा फोटो असेल त्याला नॉर्मल इफेक्ट द्यायचा आहे टोटल तुम्हाला मॉडेल चे तीन फोटो घ्यायचे आहेत फोटो लाईटरूम ॲप मध्ये इम्पोर्ट करायचा आहे. फोटो इम्पोर्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये जो फोटोज् चा ॲप असेल त्यामध्ये मॉडेल चे फोटो ओपन करून घ्यायचे आहेत फोटो ओपन केल्यानंतर खालती एक शेअर च आयकॉन दिसेल त्यावर ती क्लिक करून तुम्हाला लाईटरूम ॲप वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर फोटो लाईटरूम ॲप मध्ये इम्पोर्ट होऊन जाईल.


STEP 02 :

फोटो इम्पोर्ट केल्यानंतर पुढील दिलेल्या सर्व ऍडजेस्टमेंट करून घ्यायच्या आहेत.


       Light                    Color 

  1. Contrast (36)                1. Temp (37)
  2. Shadows (-28)             2. Tint (14)
  3. Blacks (-20)                  ३. Saturation (7)

     Effects                  Detail 

  1. Texture (84))            1. Noise Reduction (72)
  2. Clarity (30)                2. Detail (38)                      

एवढी ऍडजेस्टमेंट केल्यानंतर..


वरील इफेक्ट तुमच्या मॉडेलच्या फोटोवर बघायला भेटेल त्यानंतर तुम्हाला फोटो सेव्ह करून घ्यायचा आहे.


STEP 03 :

वरील सर्व ऍडजेस्टमेंट केल्यानंतर मॉडेलच्या फोटो मागचा बॅकग्राऊंड इरेज करायचा आहे त्यासाठी बॅकग्राऊंड इरेज ॲप ओपन करून घ्यायचं आहे. तुम्हाला तुमच्या मॉडेलची तीन फोटो इरेज करून घ्यायची आहेत त्यासाठी तुम्हाला फोटो ॲड करायचं आहे आणि मॅन्युअल साईज ऍडजेस्ट करून तुम्हाला तिन्ही फोटो इरेज करून घ्यायची आहे. फोटो मागचा बॅकग्राऊंड इरेज केल्यानंतर तुम्हाला फोटो पीएनजी फॉरमॅटमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे. त्यानंतर पिक्सआर्ट ॲप ओपन करायचा आहे आणि ते इरेज केलेले तिन्ही फोटो ॲड करायचे आहेत. त्यानंतर पुढील प्रमाणे स्ट्रक्चर तयार करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला वरती एक इरेजर चा ऑप्शन बघायला भेटेल त्यावर ती क्लिक करून पुढील प्रमाणे ऍडजेस्टमेंट करून फोटो व्यवस्थित इरेज करून घ्यायचं आहे फक्त खालील थोडा भाग तुम्हाला इरेज करायचा आहे.

तर मित्रांनो वरील ऍडजेस्टमेंट करून तुम्हाला अशा प्रकारचे स्ट्रक्चर तयार करून घ्यायचे आहे. स्ट्रक्चर तयार केल्यानंतर पीएनजी फॉरमॅटमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे.


STEP 04 :

स्ट्रक्चर पीएनजी फॉरमॅटमध्ये सेव्ह केल्यानंतर डिझाईन तयार करायची आहे त्यासाठी तुम्हाला पिक्सआर्ट एप्लीकेशन ओपन करून घ्यायच आहे.  पिक्सआर्ट एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी बॅकग्राउंड तिथे ऍड करून घ्यायचा आहे बॅकग्राऊंड पूर्णपणे सेट केल्यानंतर आपण तयार केलेले मॉडेलच्या फोटोचे स्ट्रक्चर तुम्हाला ऍड करून घ्यायच आहे आणि त्यानंतर ते स्ट्रक्चर व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि मटेरियल मध्ये तुम्हाला एक स्मोक पीएनजी दिली आहे तर ती पीएनजी तुम्हाला इथे ऍड करून घ्यायची आहे पीएनजी ऍड केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे एवढं केल्यानंतर मॉडेलच्या नावाची कॅलिग्राफी तुम्हाला ऍड करून घ्यायची आहे कॅलिग्राफी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे आणि तुम्हाला मटेरियल मध्ये एक बलून ची पीएनजी दिली आहे ती पीएनजी सुद्धा सेट करून घ्यायची आहे. एवढी प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला शेवटला एक डायलॉग दिला आहे तो डायलॉग सुद्धा तुम्हाला सेट करायचा आहे आणि मॉडेलची बर्थडे डेट तुम्हाला टाकून घ्यायची आहे. मॉडेलची बर्थडे डेट टाकण्यासाठी तुम्हाला खालती एक टॅक्सचं ऑप्शन बघायला भेटेल सिंपली तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जी मॉडेलची बर्थडे डेट असेल ती डेट टाकून तुम्हाला व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे.


STEP 05 :

मित्रांनो एवढी प्रोसेस केल्यानंतर बॅनर तयार होऊन जाईल. तुम्हाला बॅनर सेव करून घ्यायचं आहे. बॅनर सेव करण्यासाठी तुम्हाला वरती एक डाउनलोड च आयकॉन बघायला भेटेल त्यावर ती क्लिक करून तुम्हाला बॅनर सेव करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही ते बॅनर व्हाट्सॲप वरती किंवा सोशल मीडिया वरती पोस्ट करू शकता.




तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच होतं मी आशा करतो की तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटू या अशाच एका नवीन आणि फुल एडिटिंग ब्लॉग सोबत तोपर्यंत काळजी घ्या.. 

जय हिंद.! जय महाराष्ट्र.!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या