महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन बॅनर एडिटिंग | फ्री PLP फाईल

 जय शिवराय मित्रांनो..! मी धिरज साळोखे स्वागत करतो तुमच आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन निमित्त जी बॅनर डिझाईन असते ती कशा प्रकारे तयार करायची हे मी आजचा ब्लॉग मध्ये सांगितलं आहे.



● थोडक्यात माहिती : 

सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिना निमित्त भगव्या व शिवमय शुभेच्छा..! हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. आणि हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण माणसांसाठी उत्साहदायक असतो. 

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची घटना 1 मे 1960 रोजी घडली होती. त्यापूर्वी महाराष्ट्र बाबतच्या प्रदेशाचा रूपात महाराष्ट्र येथे तीन प्रदेशाचा संयुक्त समावेश होता. मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या सामावेशानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

 महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाल गंगाधर तिलक, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अजून खूप महापुरुषांचा अतिशय महत्त्व आहे. महाराष्ट्र शब्द हा संस्कृत मधुन आलेले आहे. संस्कृत मधील महा म्हणजेच महान आणि राष्ट्र म्हणजेच देश हे दोन शब्द एकत्र येऊन तयार झाला आहे. महाराष्ट्र शब्दाचा अर्थ होतो महानराष्ट्र. जय महाराष्ट्र..!

Maharashtra Din Banner Editing 2023

● बॅनर डिझाईन तयार करण्यासाठी लागणारे ॲप PIXELLAB. 


STEP 01 : 

सर्वात आधी मित्रांनो आपलं जे मटेरियल असेल ते तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचं आहे मटेरियल मध्ये तुम्हाला 1 PIXELLAB PLP फाईल दिली आहे. त्याच सोबत काही सुट्टे मटेरियल सुद्धा दिलं आहे. त्यामध्ये तुम्हाला BACKGROUND, PNG, CALLIGRAPHY, DIALOG दिलं आहे. तर हे सर्व मटेरियल तुम्ही खालती scroll down करून डाऊनलोड करू शकता.



STEP 02 :

आपलं मटेरियल डाउनलोड केल्या नंतर तुम्हाला मटेरियल मध्ये जी PLP फाईल दिली आहे. ती PIXELLAB APP मध्ये OPEN करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला आपली डिझाईन PIXELLAB  APP मध्ये बघायला भेटेल.



STEP 03 : 

PLP फाईल OPEN केल्यानंतर तुम्हाला PLP फाईल मध्ये दोन चेंजेस करायचे आहेत. 1) मॉडेल चे फोटो 2) मॉडेल चे नाव हे दोन चेंजेस करण्यासाठी तुम्हाला LAYER ICON वरती क्लिक करायचं आहे. 


त्यानंतर तुम्हाला मॉडेल चे फोटोच्या LAYER वरती जे डोळ्याचं ICON आहे. त्यावर क्लिक करायचं आहे. आणि जे मॉडेल चे नाव आहे त्या LAYER चा LOCK काढायचा आहे.



STEP 04 : 

तुम्हाला आता तुमच्या मॉडेल च्या फोटोची PNG ADD करायची आहे. त्यानंतर PNG तुम्हाला योग्य जागी सेट करायची आहे. त्यानंतर मॉडेलच्या नावावर क्लिक करायचा आहे. आणि EDIT OPTION वर क्लिक करून मॉडेल चे नाव चेंज करायचे आहे.



STEP 05 : 

एवढी प्रोसेस केल्यानंतर डिझाईन तयार होऊन जाईल. तुम्ही आपलं सुट्ट मटेरियल वापरून सुद्धा डिझाईन तयार करू शकता. डिझाईन SAVE करण्यासाठी तुम्हाला SAVE ICON वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर QUALITY ULTRA SELECT करून तुम्हाला SAVE TO GALLERY या OPTION वर क्लिक करायचं आहे. तुमची डिझाईन GALLERY मध्ये HD QUALITY SAVE होऊन जाईल.


MATERIAL DOWNLOAD


मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच होतं तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल. अशी मी आशा करतो चला तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद.! जय महाराष्ट्र.!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या